क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कोविडसाठी सुसज्ज अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

सातारा, दि13 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोविड अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आलेली आहे. हा अतिदक्षता विभाग कोविड रुग्णांसाठी मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात अत्याधुनिक कोरोना केटर सेंटर उभारण्यात आले आहे, याचे उद्घाटन आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
14 आयसीयु बेड, 7 व्हेंटीलेरची तसेच इतर सुविधा कोरोना सेंटरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेले हे सेंटर सर्वसामान्यासाठी दिलासादायक ठरणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, नागरिकांनी घाबरुन न जाता काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा म्हणजेच वेळीच उपचार करता येतील.

बाहेरच्या जिल्ह्यातील प्रवास करुन आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती न लपावता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्षता घेऊन बाजार पेठांमध्ये वस्तु खरेदी करतांना सुरक्षीत अंतर पाळण्याबरोबर मास्क प्रत्येकाने घालने बंधनकारक आहे, तरी नागरिकांनी प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जनतेनेही प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. कोणीही उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) श्री. देसाई यांनी यावेळी केले.
थोडे नवीन जरा जुने