कृषीमंत्र्यांनी केले ऑक्सीजन पार्कचे कौतुक

यवतमाळ, दि. ६ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात वन विभाग अनेक प्रयोगशील उपक्रम राबवित आहे.

पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच शहरातील नागरिकांना निरोगी राहण्यासाठी स्वच्छ हवेची आवश्यकता ऑक्सीजन पार्कसारख्या उपक्रमातून मिळते.

यवतमाळ शहरात वन विभागाने साकारलेल्या ऑक्सीजन पार्कचा आदर्श इतरही जिल्ह्यांनी घ्यावा, या शब्दात राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी ऑक्सीजन पार्कचे कौतुक केले.

यावेळी कृषीमंत्र्यांनी ऑक्सीजन पार्कमध्ये पिंपळाचे रोपटे, वनमंत्र्यांनी वडाचे रोपटे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी बेलाचे रोपटे,

मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी पिंपळाचे तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वडाचे रोपटे लावले. यवतमाळ वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखडे हे यावेळी उपस्थित होते.

तर उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी मंत्री महोदयांना ऑक्सीजन पार्कबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी,

तहसीलदार कुणाल झाल्टे, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, वनविभागाचे मकरंद गुजर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र गौपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गुल्हाणे, सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एम. मेश्राम आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने