राम प्रधान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

मुंबई,दि.३१ : अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व राज्‍याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.


 

राम प्रधान हे महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुभवी मुत्सद्दी अधिकारी, विचारवंत तसेच भाष्यकार होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते राज्यातील तसेच देशातील अनेक महत्त्वपुर्ण सामाजिक व राजकीय घडामोडींचे साक्षीदार होते.

मुख्य सचिव तसेच केंद्रीय गृह सचिव या नात्याने त्यांनी देशापुढील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले.

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपले घटनात्मक दायित्व जबाबदारीने पार पाडले. प्रशासकीय चौकटीत राहून तसेच त्यानंतर एक विचारवंत म्हणून राम प्रधान यांनी केलेले राष्ट्रकार्य निरंतर स्मरणात राहील, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. 

थोडे नवीन जरा जुने