लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात अभिवादन

मुंबई दि 23 – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


 “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी मिळवून दिलेल्या ‘स्वराज्या’चे आपण सर्वांनी मिळून ‘सुराज्या’त रुपांतर करुया असे, 

आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा उपस्थित होत्या.
थोडे नवीन जरा जुने