लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधानमंडळात अभिवादन

मुंबई दि 23 – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या  जयंतीनिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवनातील टिळकांच्या अर्धकृती पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन येथे आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, विधानसभा सदस्य हिरामन खोसकर, नितीन पवार, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, आदींसह विधानमंडळाचे अधिकारी यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

थोडे नवीन जरा जुने