कोविडसंदर्भात राज्यात १ लाख गुन्हे ५४ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. ७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ५४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६३ हजार ४६५ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ६ जुलै या कालावधीत अटक केलेल्या व्यक्तींची संख्या – २९ हजार ७९२ पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९६ (८६३ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०५ हजार ९५८ पोलिसांनी हातावर क्वारंटाईन शिक्का मारून विलगीकरणात पाठविलेल्या–८०१. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५ जप्त केलेली वाहने – ८८ हजार ७५७.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ७१ (मुंबईतील ४१ पोलीस व २ अधिकारी असे एकूण ४३, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ४,

ठाणे ग्रामीण १ पोलीस व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १, पालघर १, रायगड १, जालना १ अधिकारी, अमरावती शहर १ wpc, उस्मानाबाद-१,

नवी मुंबई srpf १ अधिकारी) कोरोना बाधित पोलीस – ११८ पोलीस अधिकारी व ९७१ पोलीस कर्मचारी सोशल डिस्टेन्सिंग पाळा कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.

तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने