राज्यात १ ते १६ जुलैपर्यंत १५ लाख ७५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री छगन भुजबळ

मुंबई दि. 17. राज्यात दि. 1 जुलै ते दि . 16 जुलैपर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 15 लाख 75 हजार 195 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात दि. 1 एप्रिल ते दि . 16 जुलै या कालावधीत गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 15 लाख 75 हजार 195 अशा एकूण 1 कोटी 5 लाख 54 हजार 724 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने