राज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट

मुंबई, दि ७ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथील प्राचीन देवी मंदिर येथे जाऊन देवीची आरती केली.

यावेळी राज्यपालांनी लोकांच्या सुख, समाधान व उत्तम आरोग्याकरिता प्रार्थना केली. अनेक वर्षांपासून आषाढ महिन्यात या दिवशी येथे विशेष पूजा होत असते.

मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देवी मंदिर प्रवेश नियंत्रित करण्यात आला. राजभवन येथील देवी ही सागरमाता, साकळाई तसेच श्री गुंडी या नावाने ओळखली जाते.
थोडे नवीन जरा जुने