राज्यात १ ते २३ जुलैपर्यंत २२ लाख ३५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई दि. 24.  राज्यात दि. 1 ते दि . 23 जुलैपर्यंत 872 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 22 लाख 35 हजार 152 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040,जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 22 लाख 35 हजार 152 आणि  असे दि.  1 एप्रिल  ते  दि . 23 जुलै या कालावधीत एकूण 1 कोटी  12 लाख 14 हजार 681 शिवभोजन थाळ्यांचे वाटप केले  आहे.

थोडे नवीन जरा जुने