कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ७६ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१४ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ७६ हजार ४१८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ९६ हजार ४७० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १३ जुलै या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१२ (८७० व्यक्ती ताब्यात) १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार ००७ राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे,

अशा ८०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५ जप्त केलेली वाहने – ९१ हजार १२७. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८२ (मुंबईतील ४५ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,

नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५, ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, जालना ग्रामीण १, अमरावती शहर १, उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी, औरंगाबाद शहर १, नवी मुंबई १) कोरोना बाधित पोलीस – १४७ पोलीस अधिकारी व १०६५ पोलीस कर्मचारी
थोडे नवीन जरा जुने