राम प्रधानांच्या निधनामुळे एक मार्गदर्शक गमावला! – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई, दि. ३१ : माजी केंद्रीय गृह सचिव आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांच्या रूपात एक मार्गदर्शक गमावल्याचे म्हटले आहे.


 

प्रधान यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, शंकरराव चव्हाणांच्या काळापासून माझा त्यांच्याशी परिचय होता. ते एक अभ्यासू, कार्यतत्पर आणि कणखर अधिकारी होते.

मागील अनेक वर्षे मी त्यांच्या नियमित संपर्कात होतो व वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शनही घेत होतो. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यात त्यांनी मोठे सहकार्य केले होते. देश व राज्य पातळीवरील अनेक महत्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान होते. 

थोडे नवीन जरा जुने