लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. ३० : उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी


समारोह कार्यक्रमाचे शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता ऑनलाईन (झूम च्या माध्यमातून) आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

 

या कार्यक्रमाचे  उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,

उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत.

श्री.सामंत म्हणाले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह  निमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  (झूम)च्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आतापर्यत या संदर्भात तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. आणि वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कसे करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी ऑनलाईन युट्यूब च्या माध्यमातून  https://youtu.be/EpQ2y3-Swfs या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.सामंत यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने