माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने ज्येष्ठ,अनुभवी, नेतृत्व काळाच्या पडद्याआड – मंत्री विजय वडेट्टीवार

 मुंबई, दि. ३१ :- ज्येष्ठ, अनुभवी, मार्गदर्शक  माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.

मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, इंदिराजींपासून ते आजपर्यंत    प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. डॉ. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील मोठे नेतृत्व होते.   देश घडविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.   त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राची आणि काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे.

त्यांच्या निधनामुळे देशामध्ये व काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

थोडे नवीन जरा जुने