शारीरिक शिक्षणाचा समावेश दिक्षा अॅपमध्ये करणार- शिक्षण संचालक दिनकर पाटील

संदीप घावटे,शिरुर :-  कोरोना सारख्या विचीत्र परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोगप्रतिकारक शक्ती माणसाला तारते आहे . ही रोगप्रतीकारक शक्ती योगा, प्राणायम, सूर्यनमस्कार, एरोबिक्स तसेच इतर व्यायाम प्रकारातून निर्माण होते. या सर्व बाबी शारीरिक शिक्षणात येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यां समवेत शिक्षक, पालक व समाजासाठी अत्यंत महत्वाची व रोगप्रतीकारक क्षमता वाढविण्यासाठी महत्वाची आहे. शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलने तयार केलेले ई कंटेंट हे दिक्षा अॅप व जिओ टीव्ही चॅनलवर घेण्यात 

येऊन सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शासन घेईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक तथा शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले. महाराष्टात संघटना स्तरावर प्राथमतःच असा प्रयत्न झाला असल्याचे नमुद करून शारीरिक शिक्षक संघटना, व तंत्रस्नेही पॅनलचे कौतुक केले.महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व महाराष्ट्र शारीरिक 

शिक्षण तंत्रस्नेही पॅनलं द्वारा निर्मीत शारीरिक शिक्षण ई कंटेंटच्या शुभारंभ दिनकर पाटील यांच्या शुभहस्ते झाला त्या प्रसंगी ते बोलत होते. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त यांनी शारीरिक शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालून सुदृढ व हेल्थी समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमातून शासनाचा क्रीडा विभाग कार्यरत असल्याचे 

मत व्यक्त क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी व्यक्त केले व तंत्रस्नेही पॅनलच्या कार्याचे कौतुक केले. तर शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागात समन्वय राहिल्यास भारताचा आधारस्तंभ असलेला विद्यार्थी सुदृढ झाला तर कोरोना सारख्या कितीतरी महामारीला तो पळवून लावेल असे मत सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केले .

 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २२० शारीरिक शिक्षकांना एकत्रित करून सात दिवसांचे ट्रेनींग देण्यात आले. जवळपास 49 विविध विषयाचे पॅनल तयार करून तंत्रशुद्ध ई कंटेंट तयार करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून गूगल फॉर्म लिंकद्वारे सुरक्षिततेचा विचार करून ऑनलाईनचा शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु कसा केला या बाबतची माहिती ज्यांच्या अथक प्रयत्नाने तंत्रस्नेही पॅनल तयार झाले 

असे महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मान्यवरांना देत शारीरिक शिक्षकांच्या संचमान्यता, खेळाडू अपघात विमा, निवड श्रेणीसाठीची अटी शिथील करणे तसेच विविध प्रश्ना संदर्भात अवगत केले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा महासंघाचे खेळाडू आनंद पवार यांनीतर सूत्र संचलन वरीष्ठ सहसचीव राजेश जाधव यांनी केले 

या प्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दिक्षीत,बालभारती अभ्यासगट सदस्य राजेंद्र पवार, सुवर्णा देवळणकर, लक्ष्मण चलमले, जयदिप सोनखासकर, दत्तात्रय मारकड, सचिन देशमुख, रोहित आदलिंग, घनशाम सानप या तंत्रस्नेहींनी कार्याचा परिचय दिला.   शा. शि. महासंघ पुणे सचिव चांगदेव पिंगळे,समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, 

क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे, अमरावती संघटनेचे सहसचिव शिवदत ढवळे, प्रीतम टेकाडे, डॉ जितेंद्र लिंबकर,अविनाश बारगजे, गणेश माळवे, अनिल पाटील, डॉ नितीन चवाळे, यांनी शुभारंभानिमीत्त शुभेच्छा दिल्या. गणेश म्हस्के, बाळासाहेब कोतकर, प्रशांत खिलारी यांनी तांत्रिक सहकार्य केले . या ऑनलाईन सोहळ्यास यू ट्युब लाईव्ह व झुम बैठकीस ३२०० शिक्षक महाराष्ट्र भरातून उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने