पूरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने द्या – विधानसभाध्यक्ष नाना पटोले

 भंडारा, दि. ३१ : अचानक उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन बचाव व शोध कार्यात सज्ज असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती दलाच्या सहकार्याने जिल्ह्यातील ४२०० कुटुंबातील १८ हजार लोकांना तात्पुरत्या शिबीरात हलविण्यात आले आहे.



 या शिबीराला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी भेट दिली. तसेच भंडारा शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली.

तात्पुरत्या शिबीरातील नागरिकांची अँटीजेन तपासणी करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, भोजनाची व्यवस्था करणे यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना नाना पटोले व विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व अधिकारी उपस्थित होते.

भंडारा शहर ५, भंडारा ग्रामीण २३, पवनी २२ तुमसर ५, मोहाडी ६ व लाखांदूर २ असे तात्पुरते शिबीर उभारण्यात आले आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे १६३ सदस्य विविध भागात ३० बोटीच्या साहाय्याने पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहचवित आहेत. आता पाणी वाढणार नसून नागरिकांनी घाबरुन न जाता सहकार्य करावे. प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदत केली जाईल, अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली.

राज्य प्रतिसाद दलाच्या २ चमु जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. मोठया प्रमाणात शोध व बचाव कार्य सुरु आहे. जिल्ह्यात २ हजार ६४५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

भंडारा शहरात निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असून अभिषेक नामदास यांनी बचाव व शोध कार्यांतर्गत १५० कुटुंब सुरक्षित ठिकाणी पोहचविले असून आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

जवाहर नगर-पिंपरी येथे एसडी आरएफ पथकाद्वारे ६०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच मोहाडी व तूमसर तालुक्यात एसडीआरएफच्या दुसऱ्या चमुद्वारे ७०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सदरच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांनी मागील ३६ तासादरम्यान शोध व बचाव कार्य करुन परिस्थितीवर प्रशासन नजर ठेवून आहे.

सर्वांना तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था व भोजन देण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे व्यवस्था केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ११ बोटद्वारे शोध व बचाव कार्य करण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा पूरपस्थिती सद्यस्थिती भंडारा तालुका – टाकळी – १४ कुटुंब, तिड्डी – ३२ कुटुंब, गणेशपूर – २७ कुटुंब, भोजापूर – ४७ कुटुंब, लोहारा – ४९७ लोक, पेवठा – ३५० लोक, कोंढी – ४ कुटुंब, करचखेडा – २२ कुटुंब, खमारी – १५ कुटुंब, कोथुर्णा – ८२ कुटुंब, कारधा – ३९०, खैरी – १ कुटुंब, करचखेडा – १० कुटुंब, दवडीपार बेला – ३० कुटुंब, पिंडकेपार – ३० कुटुंब, कोरंभी – ३१ कुटुंब, सालेबर्डी – १८ कुटुंब, आमगाव-१ कुटुंब, खैरी-९ कुटुंब, मोटोरा- ३ कुटुंब, खापा सालबर्डी-७ कुटुंब, पिपरी-१२० कुटुंब, एकूण ३८११, नुकसानग्रस्त व्यक्ती १३  हजार ८११ व आपत्ती केंद्र २४ आहेत.

पवनी तालुक्या-मांगली चौरास-९० कुटुंब, ईसापूर-५० कुटुंब, उमरी-४० कुटुंब, पौना बुज-१० कुटुंब, भोजापूर-३२ कुटुंब, रुयाड ६० कुटुंब, जुनोना-३ कुटुंब, कुर्झा-७८ कुटुंब, ईटगाव-४० कुटुंब, कोरंभी-१० कुटुंब, रेवनी-४ कुटुंब, विलम-६ कुटुंब, खातखेडा-४ कुटुंब, वलनी-२ कुटुंब, शिवनाळा-४ कुटुंब, वडेगाव-२ कुटुंब, बाम्हणी-२ कुटुंब, पवनी-३ कुटुंब, येनोडा-३ कुटुंब, कोदुर्ली-३० कुटुंब असे एकूण १४७९ कुटुंब, नुकसानग्रस्त व्यक्ती ७२७४ व आपत्ती केंद्र २७ आहेत.

तुमसर तालुका- तामसवाडी-४७ कुटुंब, पांजरा-१५ कुटुंब, सितेपार-२५ कुटुंब, परसवाडा-२० कुटुंब, रेंगेपार-२० कुटुंब असे एकूण १२७ कुटुंब, नुकसानग्रस्त व्यकती ५२८ व आपत्ती केंद्र ५ आहेत.

मोहाडी तालुका- बेटाळा-७, मुंडरी बु.८५ कुटुंब, मुंढरी खु. ४५ कुटुंब, देव्हाडा-१४ कुटुंब, निलज खुर्द-३ कुटुंब, हिवरा-१० कुटुंब एकूण ४०३ कुटुंब, नुकसानग्रस्त व्यक्ती १७१२ व आपत्ती केंद्र ७ आहेत.लाखांदूर तालुका- मोहरणा -४० कुटुंब, इटान १७ कुटुंब एकूण ६ हजार ४२६ कुटुंब, नुकसानग्रस्त व्यक्ती २६ हजार ४ असून आपत्ती केंद्र ७८ आहेत.  साकोली व लाखनी  आपत्ती झालेली नाही.

थोडे नवीन जरा जुने