प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने अभ्यासू आणि मुरब्बी राजकारणी हरपला

 मुंबई, दि. 31 : माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशाने अभ्यासू आणि मुरब्बी राजकारणी गमावला आहे अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी हे उत्तम संसदपटू होते. सभागृहात कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण बोलण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. केंद्र शासनात संरक्षण, अर्थ, उद्योग, अशी विविध महत्त्वपूर्ण खाती त्यांनी सांभाळली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते अतिशय विश्वासू समजले जात.

त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे यांनी सर्व राजकीय पक्षात मित्र जोडले होते. विशेषतः केंद्रात सत्तांतर झाल्यानंतरही राष्ट्रपती पदावर काम करताना या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने