इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. ४ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ख्यातनाम नाट्यकर्मी व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.


 

इब्राहिम अल्काझी हे वैश्विक दृष्टीकोन लाभलेले नाट्यकर्मी होते. ते प्रतिभासंपन्न कलाकार, कलाप्रेमी व गुरु होते. 

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या.

त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देतात. त्यांच्या निधनाने भारतीय कला नाट्य क्षेत्राने एक अद्भुत रत्न गमावले आहे, असे कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.    

थोडे नवीन जरा जुने