याच महिन्यात शाळांची घंटा वाजणार

 देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता हळूहळू परिस्थितीत पूर्वपदावर येत असल्याचे पाहता शाळांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत केंद्राने निर्णय घेतला असून 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.

शाळा सुरु करण्यात येत असले तरी ऑनलाईन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे.

असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

*या नियमांचे पालन करावे लागणार*

कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नसेल.

शाळांमध्ये कोणतीही अॅक्टीव्हिटी सुरू करण्यापूर्वी संबंधित भागात सॅनिटायजेशन करावे.

शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग (50 टक्क्यांपर्यंत) यांना शाळांमध्ये ऑनलाइन टिचिंग किंवा टेली काऊन्सिलींग वा इतर कामांसाठी बोलावण्यात येईल.

प्रत्येक वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असेल.

दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फूट अंतर असावे,  त्यामुळे शाळांमध्ये बसण्याची रचना कोरोनाच्या नियमांनुसार करावी.थोडे नवीन जरा जुने