‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

 सातारा दि. 18 (जि.मा.का): जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

ह्या पुस्तिकेमध्ये कोरोना उपाययोजनेबाबत उपयुक्त माहिती असून ही पुस्तिका गावागावातील नियुक्त केलेल्या पथकाद्वारे दिली जाणार आहे.

थोडे नवीन जरा जुने