‘दिलखुलास’ मध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘कोरोना : अवास्तव भीती व गैरसमज’ या विषयावर मुलाखत

 मुंबई, दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील पहिला भाग ‘कोरोना : अवास्तव भीती व गैरसमज’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर  बुधवार, दि. 9 व गुरूवार, दि. 10 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोरोनाबद्दल गैरसमज, एखाद्याला जर कोरोना झाला तर समाजाचा, घरातील लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अज्ञान आणि भीतीतून निर्माण झालेले प्रश्न, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची उपलब्धता याबद्दल सविस्तर माहिती या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

थोडे नवीन जरा जुने