९ सप्टेंबरला मुंबईत काय होणार ?

टीम महाअपडेट :- मुंबईला पाकव्याप्त काश्मीर अशी उपमा दिल्याने सापडलेल्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविरुद्ध सध्या टीकेची झोड उठविली आहे.
तिच्या या वक्तव्यांवर शिवसेनेच्या गोटातूनही सातत्याने प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, येत्या ९ तारखेला कंगना राणौत मुंबईत येणार आहे. त्यावेळी कंगनाला शिवसेना स्टाईल ‘इंगा’ दाखवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केलाय. 

त्यामुळे आता ९ तारखेला मुंबईत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट तयार करण्याची हिंमत दाखवली’, असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणौत हिने केले आहे. 

‘हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षांच्या कालखंडात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही’. ‘मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा शिवाजी महाराज आणि झाशीच्या राणीवर चित्रपट तयार केला.

त्यासाठी मी जीव आणि कारकीर्द पणाला लावली होती. मात्र, महाराष्ट्राच्या या ठेकेदारांनी आजवर काय केले’, असा जळजळीत सवाल कंगना राणौतने शिवसेनेला विचारलाय.

थोडे नवीन जरा जुने