'या' अटी आणि शर्थीच्या आधारावर पुण्यातील उद्याने 1 नोव्हेंबरला होणार खुली !


कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या 1 नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.

कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या नियमांचे पालन करणे बंधनकारक

सकाळी 6 ते 8 संध्याकाळी 5 ते 7 अशापद्धतीने चार तास उद्यानं खुली राहणार

मास्क,सॅनिटायजरचा वापर अनिवार्य

6 फूट शारीरिक अंतर पाळणं बंधनकारक

10 वर्षांच्या खालील मुलं आणि 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक यांना प्रवेश नाही

घसरगुंडी, झोके ,सी सॉ ही खेळणी तसंच जिम,व्यायामाची सामुग्री वापरता येणार नाही

नियमभंग केल्यास संबंधित उद्यान बंद करणार  

थोडे नवीन जरा जुने