10 वर्षांत पहिल्यांदाच बँका सोन्याची विक्री का करत आहे? जाणून घ्या या मागचं कारण


नवी  दिल्ली -
कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. यातच दरदिवशी सोने- चांदीचे भाव चढउतार होत आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ झाल्याची पाहायला मिळाली होती. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.


गेल्या दहा वर्षांत पहिली अशी वेळ आहे जेव्हा सेंट्रल बँकांनी सोने विकण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी सोन्याच्या किंमती अधिकच वाढल्या. त्यानंतर काही सोन्याचे उत्पादन करणाऱ्या देशांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून मिळालेल्या माहितीनुसार तिसर्‍या तिमाहीत सोन्याची एकूण विक्री सुमारे 12.1 टन्स इतकी आहे. गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकांनी सुमारे 141.9 टन सोन्याची खरेदी केली होती. ज्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक सोने विकले त्या देशांमध्ये, उझबेकिस्तान आणि तुर्की हे पहिले देश होते. रशियाच्या मध्यवर्ती बँकेने गेल्या एका 13 वर्षात पहिल्यांदाच कोणत्याही एका तिमाहीत सोन्याची विक्री केली आहे.

कोरोना विषाणू साथीच्या काळात बहुतेक देशांना आर्थिक मदतीची घोषणा करत आहेत. सध्या सोन्याच्या किमतीत होणारी वाढ लक्षात घेता या प्रसंगाचा सामना करण्यासाठी केंद्रीय बँका सोन्याची विक्री करीत आहेत. जरी इतर केंद्रीय बँकांनी सोन्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होईल, कारण पूर्वी सेंट्रल बँकानी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली होती. परंतु असेही बोलले जाते आहे की सोन्याच्या किमतीवर होणारा हा परिणाम हा काही कालावधीसाठीच असणार आहे.

जाणून घ्या या बँका सोन्याची खरेदी विक्री का करतात?

बहुतेक देश आपलं परकीय चलन फक्त डॉलरमध्ये ठेवतात. अशावेळी जर डॉलरची किंमत जास्त असेल किंवा त्या देशाचे चलन कमकुवत असेल तर डॉलर विकत घेणे किंवा इतर देणी डॉलरच्या मार्फत करणं त्या देशाला महाग पडतं. त्याऐवजी सोन्याचा पुरेसा साठा झाल्यास सेंट्रल बँक आपल्या सोन्याचे रूपांतर चलनात करून देणी देऊ शकते. यामुळे डॉलरवर अवलंबून रहावं लागत नाही व सोन्याच्या किमतीं तुलनेनी स्थिर असल्यामुळे नुकसान कमी होतं.

या देशांकडे आहे सर्वाधिक सोनं

अमेरिका - 8,133.5 टन सोनं
जर्मनी - 3,369.70 टन सोनं
इटली - 2,451 .8 टन सोनं
फ्रान्स - 2436 टन सोनं  
थोडे नवीन जरा जुने