व्हायरल - व्हाट्सएप स्टेटस 30 पेक्षा अधिक लोकांनी पाहिल्यास 500 रुपये मिळतात ! खर सत्य जाणून घ्या नाहीतर...


आजकाल सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे. अनवधानाने आपण याचे बळी पडू शकतात, यामुळे सायबर क्राईम कडून सातत्याने आवाहन करण्यात येत असते. नुकतीच एक नवीन ट्रेंड बाजरात व्हायरल झाला आहे. याबाबत आम्ही तुम्हाला अलर्ट करणार आहोत.

गेल्या काही दिवसांपासून व्हाट्सएपवर एक मेसेज सतत फॉरवर्ड होत आहे. आपले व्हाट्सएप स्टेटस 30 पेक्षा अधिक लोक पाहतात का? असा प्रश्न या मेसेजमध्ये विचारलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक असते. ही लिंक आपल्याला व्हाट्सऍप स्टेटसला ठेवायची असते व त्याबदल्यात पैसे मिळतील असेही या मेसेजमध्ये सांगितलेले असते.

या लिंकवर आपली व्यक्तिगत माहिती भरावी लागते. स्वतःचा मोबाईल नंबर, जिल्हा, इमेल आयडी अशी सर्व माहिती भरून घेतली जाते. जर आपले स्टेटस 30 पेक्षा अधिक लोकांनी पाहिले तर आपल्याला 500 रुपये मिळतील असे सांगितले जाते.

या आमिषाला बळी पडून बऱ्याच लोकांनी ही लिंक व्हाट्सएप स्टेटसला ठेवली व अनेकांनी त्यात माहितीही भरली. मात्र अजून कोणाला पैसे मिळाले नाहीत. हे पैसे देण्यासाठी बँकेचे तसेच कार्डचे डिटेल्स मागितले जाऊ शकतात व हे कोणी सायबर गुन्हेगार करत असेल तर आपल्या खात्यातून पैसेही जाऊ शकतात.

त्यामुळे याबाबत सतर्क राहण्याचा व आपल्या बँक अथवा डेबिट कार्डची कुठलीही माहिती कोणाला देऊ नका असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.  

थोडे नवीन जरा जुने