‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘वाचनातच ज्ञानाचे भांडार’ या विषयावर सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची उद्या मुलाखत

 मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचनातच ज्ञानाचे भांडार’ या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरूवार, दिनांक 15 ऑक्टोबर व शुक्रवार, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

या मुलाखतीत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे महत्त्व, वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषा विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात आलेला अभिवाचन हा उपक्रम, प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर एक लेखक म्हणून असलेली आवड, आपल्या वाचनाची प्रेरणा, वाचनाचे बदलते स्वरूप, ऑडिओ बुक तसेच सोशल मीडिया व वाचन, गझल बरोबरच ललित लेखन, कथासंग्रह, विनोदी लेखसंग्रह, शायरी, बोधकथा, कविता व गद्य लेखन, कुळकायद्यातील घरठाण हक्क, उर्दू बाबतही लिखाणाची प्रेरणा, चौफेर वाचन, शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे याविषयी सविस्तर माहिती सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे.

थोडे नवीन जरा जुने