‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य’ या विषयावर तुषार गांधी यांची मुलाखत

 मुंबई,दि.1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य या विषयावर  महात्मा गांधी यांचे पणतू  श्री.तुषार गांधी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. 2 व शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते या 7.40 वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

या मुलाखतीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती, महात्मा गांधीजी यांची तत्वे, वंचित घटकांबद्दलचे विचार, स्वच्छतेचा आग्रह, स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान,ग्रामविकास,सत्य व अहिंसा याबद्दलचे विचार,गांधीजींचा वारसा पुढे नेताना कोणत्या बाबींवर काम होणे गरजेचे आहे याबद्दल  सविस्तर माहिती श्री. तुषार गांधी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

थोडे नवीन जरा जुने