दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

 


मुंबई, दि. १६ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत २१ दिव्यांगत्वाच्या प्रकारांबाबत माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत विविध वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत.



 त्यानुसार दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता कर्णबधिर व ऐकायला येण्यास अवघड व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता  डॉ. संजय सोनावळे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

 

या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/CjGpCtUc-ak    या लिंकचा वापर करावा. तसेच यापुर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या यु टयूब चॅनल ला भेट द्यावी.

थोडे नवीन जरा जुने