पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलाची केली पाहणी

 सातारा, दि.16 (जिमाका) : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलला भेट देवून या संकुलातील विविध मैदानांची पाहणी केली.



 

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. पाटील यांनी श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील मुख्य मैदान, बास्केट बॉल मैदान, टेनिस मैदान, खो-खोचे मैदान, व्हॉलीबॉल मैदान, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल व व्यायाम शाळेची पाहणी केली.

 

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी क्रीडा संकुलातील विविध मैदान व जलतरण तलावाची दुरुस्ती करावयाची असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री यांनी मैदान निहाय व जलतरण तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात येणाऱ्या खर्चाची माहिती घेतली.

थोडे नवीन जरा जुने