अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचं नाव अखेर बदललं, आता 'ह्या' नावाने होणार रिलीज


मुंबई - अभिनेता अक्षय कुमार  याच्या वेगळ्या गेटअपने लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाची चर्चा होत असतानाच सोशल मीडियावर मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या सिनेमावर टीका करतानाच अक्षयलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमाच्या नावावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु होता. 


सोशल मीडियावर या नावावरून मोठे रान उठले होते. अगदी या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी केली गेली होती. काही हिंदू संघटनांनीही या नावाला विरोध केला होता. हा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसताच अखेर मेकर्सनी सिनेमाचे टायटल बदलण्याचा निर्णय घेतला. आता हा सिनेमा ‘लक्ष्मी’ या नव्या नावाने प्रदर्शित होईल.

 ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर स्पष्टीकरण देताना सिनेमाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी हे नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले होते.  त्यांनी सांगितले होते की, आमच्या तमिळ सिनेमाचे मुख्य कॅरेक्टर कंचना होते. कंचनाचा अर्थ सोनं होतो जे स्वत: लक्ष्मीचे एक रूप मानले जाते. आधी आम्ही हिंदीतही ‘कंचना’ हेच टायटल ठेवणार होतो. पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं जेणेकरून हिंदी आॅडिअन्सना अपील करू शकू. मग ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव फायनल झाले. देवाच्या कृपेने हे कॅरेक्टर सिनेमात धमाक्यासारखा येते. त्यामुळे आम्ही हिंदी सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवल्से. ज्याप्रमाणे लक्ष्मीचा धमाका कधी मिस होत नाही त्याचप्रमाणे या सिनेमातील मुख्य भूमिकाही एक ट्रान्सजेंडर आहे आणि तो शक्तिशाली आहे. त्यामुळे हे टायटल आमच्या सिनेमासाठी पूर्णपणे योग्य आहे.’
थोडे नवीन जरा जुने