राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका !


लातूर: लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार  यांच्यासह पाहणी केली. 

उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका असा धीर दिला.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी मंत्री बसवराज पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार बाबासाहेब पाटील, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,किरण रवींद्र गायकवाड,मकरंद सावे,कृषी, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी सोबत होते.

थोडे नवीन जरा जुने