HEALTH - हिवाळ्यात गवती चहाचा हा USE, सर्दी, पडसे, तापावर झटपट आराम देईल !


हिवाळ्यात सर्दी, पडसे, ताप या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. यापासून सुटका करायची असेल तर गवती चहा हा उत्तम उपाय आहे. गवती चहा बाबत सांगायचे झाल्यास ही एक सुवासिक वनस्पती आहे.व पाने हिरवी असते. याच्या लांब लांब पाती असतात. त्यामुळे यालाच पातीचा चहा असे म्हणतात. 


सर्दी-पडसे असेल तर गवती चहा प्यावा. ताप आला असेल तर गवती चहाची भरपूर पाने घालून चहा प्यावा. याने खूप घाम येऊन ताप उतरतो. सांधे दुखणे, या तक्रारींवर गवती चहाचे तेल चमचाभर घेऊन खोबरेल तेलात गरम करावे त्यात एक कापराची वडी टाकून सांधे मालिश करावे, आणि शेकावे.

गवती चहाच्या वाफेने दररोज शेक घेतल्याने भरपूर घाम जाऊन चरबी जळते. आणि वजन कमी होण्यास मदत होते. सर्दी झाली असेल तर गवती चहात पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा तयार करा. हा काढा रोज रात्री एक कप् प्यावा व उबदार पांघरून घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी-पडसे कमी होते.

थोडे नवीन जरा जुने