पपई खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहे का ?

 


स्वस्थ राहण्यासाठी दररोज फळ खाणे महत्त्वाचे असते. अनेक आजारांचे माहेरघर आपले पोट आहे. त्यामुळे पोट चांगले ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी.


जाणून घ्या पपई खाण्याचे  फायदे -

अर्ध्या पपईत जवळपास 59 कॅलरीज असतात. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि काही प्रमाणात बी आणि डी सुद्धा पपईत असते.


पपईत असलेले कॅरोटिन डोळ्यांसाठी लाभदायक असतं. डोळे नीट ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी. जे लोक नित्यनेमाने पपई खातात, त्यांना कॅन्सरचा धोका कमी असतो. पपईमध्ये कॅल्शिअमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाड मज!बूत होतात.


मात्र काही आजारांमध्ये पपई खाऊ नये. शिवाय गर्भवती स्त्रियांनीदेखील पपईचे सेवन करु नये. विशेष परिस्थितींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपई खावी.


पपईमध्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक असलेले फायबर भरपूर प्रमाणात असतं. पपईत असलेले फायबर कॅलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. 

पपईत पपेन नावाचे एंजाईम असतं. त्याच्यामुळे पचनशक्ती वाढते. पपईतून मिळणा-या व्हिटॅमिनमुळे त्वचा स्वस्थ आणि चमकदार होण्यासाठी मदत मिळते.
थोडे नवीन जरा जुने