तरुण वयात केस पांढरे झालेल्या केसांवर 'हा' उपाय करून पहा !


सध्या अनेकांना ही समस्या सतावत आहे. तरुण वयात केस पांढरे होणं ही एक सर्वसाधारण समस्या आहे. मेलेनिन या घटकाच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. 

यामागे आनुवंशिक कारणंही असू शकतात. 'बी १२' या जीवनसत्त्वाची कमतरता हे यामागचं महत्त्वाचं कारण असू शकतं. 


थायरॉइड ग्रंथींशी संबंधित समस्यांमुळे केस पांढरे होऊ शकतात. पांढऱ्या केसांचं प्रमाण कमी करण्यासाठी दररोज आवळ्याचा रस प्यायला सुरुवात करा, खोबरेल तेलाने केसांना मसाज करा. 

केसांना मेहंदी लावा. यामुळे केस काळे व्हायला मदत होईल. कढीपत्ता घालून खोबरेल तेल गरम करून डोक्याला लावा. यामुळेही केस काळे होण्यास मदत होते.

थोडे नवीन जरा जुने