काकडीचा हा USE, तुमच्या शरीरात करेल 'हे' १२ आरोग्यदायी बदल, जाणून घ्या


हे एक पित्तशामक फळ असून त्याचं शास्त्रीय नाव कुकुमिस सॅटिव्हस आहे. पाणीदार असल्याने टरबुज किंवा कलिंगडाच्याच कुळातील म्हणता येईल. चवीला रूचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यास मदत करते. इंग्रझीत कुकुम्बर, कानडीत संत्रेकाई, गुजरातीत काकाडी, तामीळ मुल्लवेल्लरी, बंगालीत खिरा, संस्कृतमध्ये एर्वारू किंवा कर्कटी अशी बरीच नावं आहेत.काकडीचे कित्येक रंग आणि आकार पाहायला मिळतात. कित्येक ठिकाणी पांढरी, पिवळी अगदी केशरी रंगाची काकडी बघायला मिळते. आपल्याकडे काकडीचे दोन प्रकार आहेत. त्यातली गावठी काकडी चवीला उत्तम असते.

» जीवनसत्त्व बीचं प्रमाण अधिक आहे, म्हणूनच चहा किंवा कॉफी ऐवजी एक स्लाईस काकडीची खावी.

» यातला ९५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवते.

» दिवसभराला आवश्यक असणारी जीवनसत्त्व काकडीतून मिळतात. सालीसकट खाल्ल्यासही फरक पडतो. सालीत जीवनसत्त्व सीचं प्रमाण भरपूर असतं.

» काकडीची साल खाणं कित्येकांना आवडत नाही. त्यांनी काकडीची साल जळजळ होत असलेल्या भागावर किंवा उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर लावल्यास खूप आराम पडेल. डोळे सुजल्यास त्यावर एक काकडीची फोड किंवा साल ठेवल्यानेही फुष्कळ आराम मिळतो.

» यातील सिलिकॉन आणि सल्फर केसांची वाढ करण्यास मदत करतात.

» काकडीची एक फोड किंवा काप आरशाच्या काचेवर चोळल्यास आरशावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.

» काकडीची चकती तोंडात वरच्या भागात जिभेच्या साहाय्याने तीस सेकंदांसाठी धरून ठेवावी. असं केल्याने तोंडाची दरुगधी येणा-या किटाणूंचा नायनाट करते.

» सकाळी उठल्यावर होणारी डोकेदुखी बंद करण्यासाठी रात्री झोपायला जाण्यापूर्वी काकडीच्या फोडी खाव्यात. सकाळी उटल्यावर कंटाला किंवा डोकेदुखी यामुळे नाहीशी होते.

» लो कॅलरीज आणि पाण्याचा साठा यामुळे डाएट करण्याऱ्या लोकांसाठी उत्तम आहे. शरीराला नको असलेले द्रव्य पदार्थ शारीराबाहेर टाकण्याचं काम करते.

» इन्शुलिन निर्माण करण्यासाठी स्वदुपिंडातील पेशीना आवश्यक असलेले द्रव्य निर्माण करणं आवश्यक आहे. ज्याचा मधुमेहीच्या लोकांना खूप फायदा होतो. काकडीत असलेले स्टेरॉल्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करायला मदत होते.

» काकडीत असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम अणि फायबर असल्यामुळे रक्तदाब सुरळीत सुरू राहतो.

» स्नायूंचे दुखणे, पायात वात भरणे यासारखे विकार दूर करण्याची क्षमता यात असते.
थोडे नवीन जरा जुने